महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हिडिओ : जे श्वानांना जमतं ते नागरिकांना का जमत नाही? - corona update in kolhapur

कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने पोलीस दलातील श्वान पथकाचा एक सोशल डिस्टन्ससिंगचा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओतून लोकांना संदेश देण्यात येतो की आपणही सोशल डिस्टन्ससिंग पाळा. जे श्वानांना जमते ते नागरिकांना का जमत नाही? असा संदेश कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आलेला आहे.

Kolhapur Police Force
जे श्वानांना जमतं ते नागरिकांना का जमत नाही?

By

Published : Apr 23, 2020, 10:21 PM IST

कोल्हापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्ससिंग पाळणे गरजचे असते. मात्र, लोक सोशल डिस्टन्ससिंग पाळत नसल्याचे दिसत आहे. मात्र, कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने पोलीस दलातील श्वान पथकाचा एक सोशल डिस्टन्ससिंगचा व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओतून लोकांना संदेश देण्यात येतो की आपणही सोशल डिस्टन्ससिंग पाळा. जे श्वानांना जमते ते नागरिकांना का जमत नाही? असा संदेश कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाकडून देण्यात आलेला आहे.

जे श्वानांना जमतं ते नागरिकांना का जमत नाही?

सध्या हा श्वानांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खुद्द कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी हा व्हिडीओ कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून व्हायरल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details