कोल्हापूर- केंद्र सरकारने नुकतेच देशातील दर्जेदार उच्च शिक्षण संस्थाच्या जाहीर केलेल्या अटल-2021 शैक्षणिक मानांकनाच्या यादीत कोल्हापूरच्या शिक्षणसंस्थेनेही स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यातल्या डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट ( Excellent award to DKTE of Kolhapur ) या स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयास देशपातळीवर ‘उत्कृष्ट‘ ( Excellent ) असे मानांकन प्राप्त झाले आहे.
दिल्ली येथे पार पडलेल्या ‘अटल रँकींग ऑफ इन्स्टीटयूटशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंटस‘ ( Atal Ranking of Institutions on Innovation Achievements ) पुरस्कार वितरण समारंभामध्ये शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांच्या हस्ते मानांकन यादीची ऑनलाईन घोषणा ( online Atal Ranking list declaration ) करण्यात आली.
हेही वाचा-Wuhan Scientists on NeoCov : चीनच्या शास्त्रज्ञांचा कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत इशारा... तीनपैकी एकाचा मृत्यू होण्याची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रात डीकेटीई ही ठरली एकमेव-
देशामध्ये डीकेटीईचे टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, अटल रॅकींग सर्वेक्षणामध्ये ‘एक्सलंट बँड‘ मध्ये गौरविण्यात आले आहे. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात आज नाविण्यपूर्ण संशोधनाला मोठे महत्व आहे. देशभरातील सर्व राज्यांमधील उच्च शिक्षण संस्थानी या मानांकनामध्ये सहभाग घेतला होता. यासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने अर्ज मागविले होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून, कोल्हापूर जिल्ह्यातील डीकेटीई या एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ‘एक्सलंट बँड‘ यादीत समावेश झाला आहे. अटल रँकीग मानांकनाला भारताच्या सर्व प्रमुख शैक्षणिक व व्यावसायिक गटांमध्ये व्यापक मान्यता मिळाली आहे. देशामध्ये उच्च गुणवत्तेच्या संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण संशोधन व उद्योजकता निर्माण करण्यसाठी ही मानांकन यादी उपयोगी ठरणार आहे अशी माहिती डिकेटीई संस्थेकडून देण्यात आली.
हेही वाचा-BS Yediyurappa's granddaughter Suicide : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नातीची गळफास घेत आत्महत्या
'या' निकषांचा विचार करून मानांकन
नवकल्पनानिर्मिती, अर्थसंकल्प व निधी, नाविण्यपूर्ण शिक्षण पध्दती, अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांमध्ये उद्योजगता जागृती व त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी सुविधा, नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि स्टार्टअपसाठी शिक्षण संस्थेमार्फत पुरविण्यात येणारे प्रोत्साहन तसेच इन्क्युब्युशन आणि उद्योजकांची भागिदारी अशा विविध निकषांचा काटेकोरपणे विचार केला जातो. या सर्व बाबींची सखोल पडताळणी केल्यानंतर सहभागी झालेल्या कॉलेजमधून डीकेटीईला हे मानांकन जाहीर झाले आहे.
हेही वाचा-BJP MLA Suspension Quashes : निलंबन रद्द, भाजप आमदार अतुल भातखळकरांनी पेढे वाटून केला जल्लोष
यापूर्वीही डीकेटीईला मिळाले आहेत पुरस्कार-
डीकेटीईस अटल रँकीगमध्ये देशपातळीवर 33 व्या मानांकनाने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच बेस्ट इंजिनिअरींग कॉलेज म्हणूनही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. डीकेटीईमध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर, पीएचडी असे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. डीकेटीईमध्ये संशोधनासाठी केंद्र सरकारकडून प्राप्त आयडिया लॅब, तसेच अनेक आंतराराष्ट्रीय सुसज्ज लॅब आहेत. याचा सर्व विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. या मानांकनासाठी संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, खजिनदार आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी मार्गदर्शन केले. इन्स्टिटयूटचे डायरेक्टर डॉ. पी.व्ही. कडोले, डे. डायरेक्टर डॉ. यु. जे. पाटील, डॉ. एल. एस. आडमुठे, डीन डॉ. आर. एन. पाटील, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी यांचा या यशात मोलाचा वाटा आहे, असेही संस्थेकडून सांगण्यात आले. .