महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर; राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनधारकांना हेल्मेट वाटप - कोल्हापूर हेल्मेट वाटप न्यूज

हेल्मेट न वापरण्यामागे अनेकजण विविध कारणे सांगतात. त्यामध्ये केस गळतात हे एक कारण सांगितले जाते. मात्र, हा लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. जरी केस गळत असतील तर आपल्या जिवापेक्षा ते महत्वाचे नाही असेही गिरी म्हणाल्या

ष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत वाहनधारकांना हेल्मेट वाटप
ष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत वाहनधारकांना हेल्मेट वाटप

By

Published : Feb 14, 2021, 1:02 PM IST

Updated : Feb 14, 2021, 3:22 PM IST

कोल्हापूर- बत्तिसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रोटरी क्लबतर्फे दुचाकीस्वारांसह पोलिस कर्मचाऱ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी ज्या वाहनचालकांनी हेल्मेट घातले नव्हते त्यांना गुलाबपुष्प देत समज देण्यात आला. शिवाय हेल्मेट घालण्याबाबत जनजागृती करण्यात आली. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. मेंदूला रिप्लेसमेंट नाहीये त्यामुळे हेल्मेट आवश्यक आहे, असा संदेश स्नेहा गिरी यांनी वाहनधारकांना दिला.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहनधारकांना हेल्मेट वाटप
हेल्मेटमुळे केस गळतात हा गैरसमज -हेल्मेट हे प्रत्येकाने वापरणे गरजेचे आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये वाहनचालक हेल्मेट वापरतात. मात्र, कोल्हापुरात अजूनही वाहनचालकांमध्ये याबाबत जनजागृती झाली नाही. हेल्मेट न वापरण्यामागे अनेकजण विविध कारणे सांगतात. हेल्मेटमुळे केस गळतात हे एक कारण सांगितले जाते. मात्र, हा लोकांनी गैरसमज करून घेतला आहे. जरी केस गळत असतील तर आपल्या जिवापेक्षा ते महत्वाचे नाही असेही गिरी म्हणाल्या.
Last Updated : Feb 14, 2021, 3:22 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details