कोल्हापूर -कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये भरसभेत राडा झाला. यामध्ये हाणामारीबरोबर बाटल्यांची फेकाफेकी सुद्धा झाली. म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या निषेधाच्या ठरवावरून हा वाद निर्माण झाला. त्यामुळे कागलमध्ये आता तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
समरजित घाटगेंच्या निषेध ठरावावरून कागल नगरपालिकेत भाजप अन् राष्ट्रवादीचे नगरसेवक भिडले - Kagal municipality
कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये समरजित घाडगेंच्या निषेध ठरावावरून वाद झाला. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये हणामारी आणि बाटल्यांची फेकाफेकी झाली.

कागल येथे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांचा कार्यक्रम होता. कार्यक्रमात समरजित घाटगे यांनी कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील यांचा अवमान केला, असा आरोप करत नगरपालिकेच्या विशेष सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी घाटगे यांच्या निषेधाचा ठराव मांडला. यावर भाजप नागरसेवकांनी हे सर्व आरोप चुकीचे असून असे काही घडलेच नसल्याचे सांगत या ठिकाणी तीव्र घोषणाबाजी केली. भाजप नगरसेवकांनी या ठरावाला विरोधसुद्धा दर्शवला. त्यानंतर दोन्ही बाजूच्या नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वादावादी झाली. वादावादी एवढी वाढली की नंतर हातघाई आणि एकमेकांवर बाटल्या फेकून मारण्या इतपत हा वाद गेला.