कोल्हापूर-कोल्हापुरात होणाऱ्या काँग्रेस कमिटी बैठकीला आमदार सतेज पाटील उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोल्हापुरात तर आमदार सतेज पाटील सातारा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आमदार सतेज पाटील गटाची नाराजी दूर करायला येणारे जयंत पाटील आता कोणाशी चर्चा करणार याची चर्चा सुरू आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वैयक्तिक वादामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.कोल्हापुरात या आघाडीत झालेल्या बिघाडीमुळे राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ही शक्यताच ओळखूनच जयंत पाटील यांनी दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय घेऊन ते आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत.