कोल्हापूर - कोल्हापूर उत्तरच्या निवडणुक प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. अशात भाजपा नेते धनंजय महाडिक यांनी केलेल्या एका विधानामुळे महिलांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेवारी दिली. मात्र 'ज्याचे काम त्यानेच करावे' असे म्हणत धनंजय महाडीकांनी महिलांचा अपमान केला असल्याची टीका आता सोशल मीडियातून सुरू झाली आहे.
Dhananjay Mahadik Controversial Statement : पती इलेक्ट्रिशियन मग ते काम तुम्हालाही जमणार का? महाडिकांचा महिलांना सवाल - जयश्री पाटील
भाजपा नेते धनंजय महाडिक यांनी केलेल्या एका विधानामुळे महिलांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेवारी दिली. मात्र 'ज्याचे काम त्यानेच करावे' असे म्हणत धनंजय महाडीकांनी महिलांचा अपमान केला असल्याची टीका आता सोशल मीडियातून सुरू झाली आहे.
काय म्हणाले धनंजय महाडिक? -काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याला राष्ट्रवादी तसेच शिवसेनेने पाठिंबा देत महाविकास आघाडी म्हणून भाजपच्या उमेदवाराने आव्हान दिले आहे. भाजपाकडून सत्यजित उर्फ नाना कदम हे रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरातील एका प्रचारसभेत बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसचे लोक येथे येईल आणि आम्ही महिला उमेदवार दिली आहे, असे सांगतील. तुम्ही सगळ्या महिला आहात. ती बिचारी आहे. तिला मतदान करा. पण मला सांगा तुमच्या कुटुंबातील तुमचा एखादा पती गेला आणि तो आधी प्लंबिंग काम करत असेल तर तुम्हाला प्लंबिंग काम जमणार आहे का? जर तुमचा पती इलेक्ट्रिशियन असेल तर तुम्हाला ते काम जमणार आहे का? ज्याचे काम त्यानेच करायचे असते. त्यांचे पती आमदार होते म्हणून लगेच त्यांच्या पत्नीला पुढे आणले असेही धनंजय महाडिक म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून ताराराणींच्या कोल्हापूरात असून सुद्धा असे विचार कसे? नारीशक्तीचा आपण अपमान केला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर आपण शंका उपस्थित केली आहे. अशा बुरसटलेल्या विचारामुळेच आपल्याला कोल्हापूरकरांनी नाकारले आहे अशा अनेक टीका सुरू आहेत.