महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रिन्स्टन - GPPI-CPR स्ट्रॅटेजिक अफेयर्स-२०१९ उपक्रमामध्ये धैर्यशील मानेंना आमंत्रन; देशातील केवळ 6 खासदारांचा समावेश - Dhairyasheel Mane selected for GPPI-CPR

गुणवत्ता, वैचारिक क्षमता तसेच अभ्यासकता या मूल्यांवर धैर्यशील माने यांची या उपक्रमामध्ये निवड झाल्याची माहिती आहे.

धैर्यशील माने

By

Published : Sep 21, 2019, 9:36 AM IST

कोल्हापूर - 'प्रिन्स्टन - GPPI-CPR स्ट्रॅटेजिक अफेयर्स - २०१९' या विशेष उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना आमंत्रित करण्यात आले आहे. लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये खासदार धैर्यशील माने यांची प्रभावी कामगिरी व लोकसभा अध्यक्षांकडून मिळालेली विशेष दाद याचीच नोंद घेत निवड झाली असल्याचे समजते. हा विशेष उपक्रम राऊंड दि टेबल चर्चासत्र, गेली ८ वर्षे सात्यत्याने, (GPPI-CPR) आणि प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जातो.

हेही वाचा -उद्धव ठाकरे म्हणतात आमचं ठरलंय, पण पाटील म्हणतात अजून ठरायचंय

GPPI-CPR म्हणजे 'गव्हर्नन्स अँड पब्लिक पॉलिसी इनिशिएटिव्ह - सेन्टर फॉर पॉलिसी रिसर्च' ज्याचा उद्द्येश, आंतरराष्ट्रीय बाबी, आंतरराष्ट्रीय संबंध, राजकीय धोरणे, जागतिक राजकारण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र समजून घेऊन त्यावर अभ्यास तसेच मार्गदर्शन करणे असा आहे. जगभरातील प्रत्येक देशाचे लोकप्रतिनिधी या उपक्रमामध्ये सहभागी होतात. प्रत्येक देशातून अगदी मोजकेच खासदार, सदस्य म्हणून या उपक्रमासाठी निवडले जातात. २०११ मध्ये या उपक्रमाला सुरवात झाल्यापासून 35 हून अधिक भारतीय संसद सदस्यांनी या उपक्रमाला हजेरी लावली आहे. दरवर्षी सदस्यांची निवड ही कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थेकडूनच केली जात असून सदस्यांची गुणवत्ता, वैचारिक क्षमता तसेच अभ्यासकता या मूल्यांवर केली जाते. या पाच दिवस चालणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय बाबी, आंतरराष्ट्रीय संबंध, राजकीय धोरणे अशा बऱ्याच मुद्य्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार असून हा कार्यक्रम 'वुड्रो विल्सन स्कूल ऑफ पब्लिक अँड प्रोग्राम, अमेरिका' येथे दिनांक १३ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
हेही वाचा -विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप : फायनलमध्ये प्रवेश करणारा अमित पांघल ठरला पहिलाच भारतीय खेळाडू

ABOUT THE AUTHOR

...view details