कोल्हापूर- कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने घालून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमानुसार राज्यातील सर्व मंदिरासह करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातदेखील भक्तांना दर्शन दिले जात ( Kolhapurs Ambabai temple ) आहे. मात्र, कोरोना नियमानुसार १० वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश दिला ( No entry for children in Mahalaxmi temple ) जात नाही. अंबाबाईच्या दर्शनासाठी लहान मुलांना मंदिरात नेण्यावरून शुक्रवारी दोन भाविकांनी सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केली.
नाशिकच्या दोन भाविकांनी देवस्थान समितीची एक महिला व एका पुरुष सुरक्षा रक्षकांच्या अंगावर जात धक्काबुक्की केल्याचा ( Devotees Attempt to attack security guards ) प्रकार घडला आहे. मंदिराच्या पूर्व दरवाज्याबाहेर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. माहिती कळताच जुना राजवाडा पोलिसांनी ( Rajwada Police ) या दोन्ही भाविकांना ताब्यात घेत सुरक्षारक्षकांची माफी मागायला लावली आहे.
हेही वाचा-Ajit Pawar In Pune : अन् अजित पवार संतापले; म्हणाले, मग काय तुरुंगात जाऊ...
दहा वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेश बंदी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रोज लाखो भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या दोन वर्षापासून करवीर निवासिनी श्री अंबाबाई चे दर्शन घेण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम येथे पाळले जात आहेत. याप्रमाणे दहा वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. त्यांच्यासाठी मंदिरात एका बाजूला बसण्यासाठी जागा तयार करण्यात आले आहे. मात्र, अनेक भाविक येथे सुरक्षा रक्षकांची हुज्जत घालत असतात.