कोल्हापूर - काल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या घरावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यानंतर आता पोलिसांवर संशय व्यक्त केला जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. राजकारणात एखाद्या राजकीय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे हे योग्य नाही. मग ते कोणत्याही पक्षाची असू दे. शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून गेले यावेळी पोलीस काय करत होते अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
Silver Oak Attack : 'राजकिय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे योग्य नाही, पोलिसांचीही चौकशी व्हावी' - Attack on Sharad Pawar house mumbai
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. राजकारणात एखाद्या राजकीय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे हे योग्य नाही. मग ते कोणत्याही पक्षाची असू दे. शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी चालून गेले यावेळी पोलीस काय करत होते अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
![Silver Oak Attack : 'राजकिय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे योग्य नाही, पोलिसांचीही चौकशी व्हावी' देवेंद्र फडणवीस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14970488-thumbnail-3x2-devendra.jpg)
देवेंद्र फडणवीस
'राजकिय व्यक्तीच्या घरावर चालून जाणे योग्य नाही, पोलिसांचीही चौकशी व्हावी'
पोलीस काय करत होते- जर मीडियाला अगोदर माहिती कळत असेल तर पोलिसांना याबाबतची माहिती का कळाली नाही. पोलीस काय करत होती. याबाबतची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या सर्व बाबींची तपासणी व्हायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
Last Updated : Apr 9, 2022, 12:26 PM IST