कोल्हापूर- आम्ही अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ही मागणी लावून धरली होती. सरसकट कर्जमाफी, सातबारा कोरा करण्याचे आश्वासन शिवसेनेने दिले होते. मात्र, त्यांनी फक्त पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. आज अवकाळी ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची गरज आहे. या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्याची तयारी नाही. मदतीची गरज आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात - फडणवीस - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण आमच्या सरकारमध्येच आम्ही दीड लाखांपर्यंतचे कर्ज महापुरावेळी माफ केले. आणीबाणीसारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली असल्याचे फडणवीस म्हणाले.
![महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात - फडणवीस devendra fadnavis kolhapur press](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5463858-thumbnail-3x2-assda.jpg)
कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण आमच्या सरकारमध्येच आम्ही दीड लाखांपर्यंतचे कर्ज महापुरावेळी माफ केले. आणीबाणीसारखी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली असल्याचे फडणवीस म्हणाले. हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र, हे अधिवेशन म्हणजे फक्त औपचारिकता होती. आम्ही ५ तास प्रश्न उपस्थित केले. मात्र, मंत्र्यांनी फक्त ३ मिनिटे बोलून उत्तरे दिली, असेही फडणवीस म्हणाले.
राज्याची आर्थिक स्थिती चांगली -
सकल उत्पन्नाच्या 15.8 टक्के इतके कर्ज आहे. 26 टक्क्यांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच राज्याचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला असल्याचे आजच्या सामना अग्रलेखातून म्हटले आहे. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे फडणवीस म्हणाले. आज दिसत असलेले उद्धव ठाकरे मी यापूर्वी पाहिले नाही, असेही ते म्हणाले.