महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरातील रुग्णालयातील 'फायर ऑडिट' करा - उपमुख्यमंत्री - kolhapur latest news

कोल्हापुरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिल्या आहेत.

अजित पवार
अजित पवार

By

Published : Jan 9, 2021, 9:41 PM IST

Updated : Jan 9, 2021, 10:47 PM IST

कोल्हापूर- कोल्हापुरातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करून घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिल्या आहेत. ते कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयातील घडलेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. त्यामध्ये कोणी हलगर्जीपणा केला असल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला. राज्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वेळेत रुग्णालयाचे ऑडिट व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Last Updated : Jan 9, 2021, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details