कोल्हापूर - कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ( Defacement of the Statue of Chhatrapati Shivaji Maharaj ) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा रात्रीच्या अंधारात काही समाजकंटकांनी शिवरायांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतला. बंगळूर मधील सदाशिवनगर (Sadashivnagar in Bangalore ) येथे ही संताप आणणारी घटना घडली आहे. कोल्हापूरात शिवसैनिकांनी कर्नाटकच्या लाल पिवळ्या झेंड्याची होळी केली त्यांच्या निषेधार्थ हे कृत्य केले असल्याचे मॅसेज सुद्धा व्हायरल होत आहेत. आता या घटनेनंतर त्याचे सर्वत्र पडसाद पाहायला मिळत असून कोल्हापूरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ( Shivsena Agitation Kolhapur ) कानडी लोकांचे व्यवसाय हॉटेल बंद पाडली आहेत.
कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना बेळगाव येथील संभाजी महाराज चौकात शिवभक्त जमले -
दरम्यान, बंगळूर येथे घडलेल्या घटनेनंतर शिवभक्त संतापले असून बेळगाव ( Sambhaji Maharaj Chowk at Belgaon )आणि कोल्हापूरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले. बेळगावमधील संभाजी महाराज चौकात शिवभक्त जमले असून कानडी समाजकंटकाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तर कोल्हापूरात सुद्धा शिवसैनिकांकडून कानडी लोकांचे दुकान तसेच हॉटेल व्यवसाय बंद (Hotel Business Closed ) पाडण्यात आले आहेत.
पुन्हा वाद सुरू -
चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीचे (Maharashtra Unification Committee ) अध्यक्षांवर शाईफेकीची घटना घडली होती. त्याच्या निषेधार्थ कोल्हापूरसह राज्यभरात ठीक ठिकाणी पडसाद उमटले होते. कोल्हापूरातील शिवसैनिकांनी कन्नड संघटनेचा लाल पिवळा ध्वज जाळला होता. त्यानंतर कन्नड संघटनेकडून सुद्धा शिवसेनेच्या चिन्हाचा भगवा ध्वज जाळण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सीमावाद सुरू आहे. मात्र पुन्हा एकदा हा वाद वाढतच चालला आहे. काल रात्री शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना घडली असून आता त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. बेळगाव तसेच कोल्हापूरात सुद्धा याचे पडसाद उमटत अनेक कानडी लोकांचे व्यवसाय कोल्हापूरात बंद करण्यात आले आहेत.