महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर : बाप्पाच्या माध्यमातून वैद्य कुटुंबीयांनी केली लसीकरणासाठी जनजागृती - kolhapur

देशभरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण मोहिम राबविली जात आहे. अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्वसामान्यांच्या मनात धास्ती आहे. तर या सर्व काळात महापालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत हे कार्य सुरू ठेवले आहे. याला प्रोत्साहन आणि जनजागृती म्हणून बाप्पासमोर कोल्हापुरातील वैद्य कुटुंबीयांनी लसीकरणाबाबतचा देखावा केला आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Sep 14, 2021, 10:47 PM IST

कोल्हापूर- कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मोठ्या उत्साहात होणाऱ्या सोहळ्यावर निर्बंध आले. गणेशोत्सव ही त्याला अपवाद नाही. तर यंदाच्या गणेशोत्सवात कोरोना प्रतिबंधक लसीमुळे निर्बंध थोडे शिथिल झाले आहेत. पण, अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्वसामान्यांच्या मनात धास्ती आहे. तर या सर्व काळात महापालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत हे कार्य सुरू ठेवले आहे. याला प्रोत्साहन आणि जनजागृती म्हणून बाप्पासमोर कोल्हापुरातील वैद्य कुटुंबीयांनी लसीकरणाबाबतचा देखावा केला आहे.

बाप्पाच्या माध्यमातून वैद्य कुटुंबीयांनी केली लसीकरणासाठी जनजागृती

कोल्हापुरातील पाचगाव रोड येथे राहणारे प्रसाद वैद्य यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक सह दैनंदिन घडामोडींवर गणेश देखावा तयार करत असतात. देशभरात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी कोविड सेंटरचा देखावा करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले होते. यंदा लसीकरणावर आधारित देखावा सादर करत महापालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेतील आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांची मनोबल वाढविण्याचे काम केले आहे.

काय आहे वैद्य कुटुंबाचा देखावा..?

वैद्य कुटुंबाने कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत चालवला जाणारा फिरंगाई लसीकरण केंद्रची प्रतिकृती उभा केली आहे. या देखाव्यात कोरोना लसीकरण संदर्भात जनजागृती असणारे फलक उभा केले आहेत. एखादा नागरिक लसीकरण केंद्रापर्यंत येईपर्यंत देण्यात येणाऱ्या सूचनांचे फलक या देखाव्यात लावण्यात आले आहेत. लसीकरण केंद्रांमध्ये आल्यानंतर रजिस्टेशन केंद्र, तपासणी केंद्र, प्रत्यक्षात लस टोचणे, प्रतीक्षा कक्ष या सर्व बाजूवर प्रकाश टाकणारे देखावा हुबेहूब साकारला आहे. नागरिकांनी लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद दिला आहे. मात्र, आजही काही नागरिक लस घेण्यापासून वंचित आहेत. शिवाय अनेक जण लसीकरणाबाबत गैरसमजुतीत आहेत. हा गैरसमज दूर होण्यासाठी श्रीगणेशाच्या माध्यमातून त्यांच्यातील हे गैरसमज दूर होण्यासाठी लसीकरण करा. हे दाखवणारा देखावा वैद्य कुटुंबाने सादर केला आहे.

हेही वाचा -पंचगंगा नदी यंदा पुन्हा पात्राबाहेर, 21 बंधाऱ्यांना जलसमाधी; सतर्कतेचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details