महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - संभाजी राजे - खासदार संभाजी राजे भोसले

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे. मात्र केंद्राकडून राज्यसरकाराला मदतीची अपेक्षा असेल तर राज्यसरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

mp Sambhaji Raje Bhosale
संभाजी राजे भोसले

By

Published : Oct 23, 2020, 8:31 PM IST

कोल्हापूर-राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे. मात्र केंद्राकडून राज्यसरकाराला मदतीची अपेक्षा असेल तर राज्यसरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजचे स्वागत

पुढे बोलतांना संभाजीराजे म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पहिला टप्पा म्हणून राज्य सरकारने १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. जाहीर केलेले पैसे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिले असून, ही बाब स्वागतार्ह आहे.

राज्य सरकारला जर केंद्राकडून मदतीची अपेक्षा असेल तर, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा, तसे केल्यास केंद्राला दखल घ्यावी लागेल. आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असेही ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details