कोल्हापूर - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवरून भाजपाने घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून ती ढोंगी आहे. या प्रकरणाची सीआयडी व सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी करण्याचा त्यांना अधिकार नाही, अशी टीका मृत सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी भाजपावर केली आहे.
सुशांतच्या आत्महत्येवर भाजपाची भूमिका ढोंगी; अश्विनी बिद्रेंचे पती राजू गोरेंची टीका - अश्विनी बिद्रे पती भाजपा टीका
सुशांतसिंहच्या आत्महत्येवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात भाजपा घेत असलेल्या भूमिकेवरून अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी भाजपाला चांगलेच सुनावले आहे. भाजपा सध्या जी भूमिका घेत आहे तीच भूमिका सत्तेत असताना अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडात घेतली असती, तर बिद्रे व गोरे कुटुंबाला न्याय मिळाला असता, असे राजू गोरे यांनी म्हटले आहे.
सुशांतसिंहच्या आत्महत्येवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात भाजपा घेत असलेल्या भूमिकेवरून अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी भाजपाला चांगलेच सुनावले आहे. भाजपा सध्या जी भूमिका घेत आहे तीच भूमिका सत्तेत असताना अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांडात घेतली असती, तर बिद्रे व गोरे कुटुंबाला न्याय मिळाला असता. भाजपाने वेळीच भूमिका घेतली असती तर आरोपीने नष्ट केलेले पुरावे हाती लागले असते. वारंवार मागणी करून देखील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले नाही. आम्हाला भेट देखील दिली नाही. जर ते सत्तेत असताना एका पोलीस अधिकाऱ्याला न्याय देऊ शकले नाहीत तर त्यांना आता अभिनेता सुशांतसिंग रजपूत आत्महत्या प्रकरणात भूमिका घेण्याचा कोणताच अधिकार नाही, असे राजू गोरे यांनी म्हटले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे १५ एप्रिल २०१६ पासून नवी मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झाल्या होत्या. त्या बेपत्ता झाल्या नसून, वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी बिद्रेंना बेपत्ता केल्याचा आरोप कुटुंबाने केला होता. काही कालावधीनंतर अश्विनी बिद्रे-गोरे या बेपत्ता झाल्या व त्यांचा खून झाल्याचे अखेर उघड झाले. या तपासात पोलीस आणि शासन सहकार्य करत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.