कोल्हापूर- ढोल ताशांच्या गजरात शहर आणि परिसरात आज नव वर्षाचे जोरदार स्वागत करण्यात आले. संस्कृती जपण्याच्या उद्देशाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हजारो तरुण-तरुणी सहभागी झाले आहेत.
ढोल ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत; कोल्हापुरात शोभायात्रेचे आयोजन
करवीर गर्जना ढोल पथकाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक वेशभूषा करून महिला बुलेट रॅलीमध्ये सहभागी झाल्या. डोक्याला कोल्हापुरी फेटा, गळ्यात विविध अलंकार, पायात कोल्हापुरी चप्पल परिधान करून महिला या शोभायात्रेत सहभागी झाल्या. विशेष म्हणजे ढोल पथकात तरुणींचा सहभाग उल्लेखनीय होता. कोल्हापुरी फेट्याबरोबरच पुणेरी पगडी परिधान केलेली एक महिला या रॅलीमध्ये सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे.

या शोभायात्रेमध्ये आपल्या वायुदलाची ताकद जगासमोर यावी या उद्देशाने लढाऊ विमानांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.