महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात सायंकाळी पार पडणार शाही दसरा सोहळा; हजारो नागरिक राहणार उपस्थित

कोल्हापूर शहरातील दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याची तयारी पूर्ण. मैदानावर सांयकाळी शमीपूजन कार्यक्रम करण्यात येणार आहे.

दसरा मैदान

By

Published : Oct 8, 2019, 4:53 PM IST

कोल्हापूर - संस्थानकालीन परंपरा असलेला शाही दसरा सोहळा आज सायंकाळी दसरा चौक येथे पार पडणार आहे. दसरा चौक मैदानात मंडपासह विशेष शामियाना उभा करण्यात आला असून सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी या मैदानामध्ये सोने लुटण्याचा म्हणजेच शमीपूजन कार्यक्रम पार पडणार आहे.

दसरा मैदानातील दृष्ये

हेही वाचा -धम्मचक्र प्रवर्तन दिन : दीक्षाभूमीवर लोटला भीमसागर

शहरातील भवानी मंडपातून भवानी मातेची पालखी तसेच अंबाबाई आणि श्री गुरुमहाराज यांच्या पालख्या ही परंपरेनुसार दसरा चौकात येत असतात. तसेच शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे, यशराजे हे सुद्धा पारंपारिक पद्धतीने मेबॅक या विशेष गाडीतून विशेष लवाजम्यासह इथे येत असतात. हा सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण कोल्हापुरातील लोक हजारोंच्या संख्येने या ठिकाणी दाखल होतात. दरम्यान, या सोहळ्याची तयारी आता पूर्ण झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा -मला सल्ला देणाऱ्या तावडेंसोबत नियतीने 'विनोद' केला - अशोक चव्हाण

ABOUT THE AUTHOR

...view details