कोल्हापूर - जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कोल्हापूर पोलिसांच्या बंदोबस्तात दारू विक्री केली जात आहे. कोल्हापूरचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाला आहे. त्यामुळे, काही नियम आणि अटी शिथील झाल्या आहेत. शिथीलता मिळाल्यावर कोल्हापुरातील दारू दुकाने उघडल्यानंतर खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली.
दारूसाठी दुसऱ्या दिवशीही नागरिकांची गर्दी; कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात विक्री सुरु - corona cases in kolhapur
नागरिकांची गर्दी आणि दारू घेण्यासाठी झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कोल्हापूर पोलिसांनी दारू दुकानाच्या परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. या अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात दारू विक्री सुरू झाली आहे.
नागरिकांची गर्दी आणि दारू घेण्यासाठी झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कोल्हापूर पोलिसांनी दारू दुकानाच्या परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. या अधिकाऱ्यांच्या बंदोबस्तात दारू विक्री सुरू झाली आहे. विशेष म्हणजे तळीरामांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यासाठी कोल्हापूरचे उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील रस्त्यावर उतरले आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.