महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 12, 2020, 11:57 AM IST

ETV Bharat / state

कोल्हापुरात गर्दी झालेली दुकाने ३ तास बंद करणार; प्रशासनाचा इशारा

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर केला होता. मात्र आता कोरोना नियंत्रणात आला आहे. प्रसार जरी कमी झाला, तरी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Crowds of citizens
नागरिकांची गर्दी

कोल्हापूर - कोल्हापुरात अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. तरीही दीपावलीच्या खरेदीसाठी कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने आता कडक पावले उचलली आहेत. ज्या दुकानांमध्ये नियमांचे पालन होताना दिसणार नाही. किंवा जास्त गर्दी दिसेल ती दुकाने 3 तास बंद करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेचे उप-आयुक्त निखिल मोरे यांनी याबाबत 'ईटीव्ही भारत'ला माहिती दिली.

. महापालिकेचे उप-आयुक्त निखिल मोरे
नागरिकांची गर्दी आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती -
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर केला होता. गेल्या महिनाभरापासून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. प्रशासन रात्रंदिवस विविध उपाययोजना राबवत आहे. मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात कोरोनाची लाट येण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली. त्याबाबत कडक पावले उचलली जात आहेत. नागरिकांबरोबरच जर एखाद्या दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी दिसली. नियमांचे पालन होताना दिसते नाही, तर ते दुकान तब्बल 3 तास बंद करण्यात येणार आहे.महापालिकेची 5 पथके तैनात-
कोल्हापुरात महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरीमध्ये बाजारपेठ असल्याने या ठिकाणी प्रामुख्याने मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे महापालिकेने या सर्वच ठिकाणी एकूण 5 पथके तैनात केलीत. त्यांच्याकडून गर्दी होणारी दुकाने बंद करण्याबाबतची कारवाई करण्यात येणार आहे.

यंदा दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करा-
दिवाळी दरवर्षी येते त्यामुळे यंदा दिवाळी साध्या पद्धतीने साजरी केली तर काहीही फरक पडणार नाही. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जर आणखी वाढला. तर पुढची दिवाळीसुद्धा अशीच जाईल. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाला सहकार्य करून साधेपणानेच दिवाळी साजरी करावी, असे आवाहन उप-आयुक्त निखिल मोरे यांनी केले आहे.

हेही वाचा- 'कोरोनाबाबत महाराष्ट्राच्या उपाययोजनांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक.. दिवाळी, हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवरसरकार सतर्क'
हेही वाचा-मुंबई कोरोना अपडेट : चोवीस तासांत 535 नवे बाधित... तर 22 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details