कोल्हापूर- लॉकडाऊन काळात नियमांचा भंग केल्याप्रकरणी तसेच जागेवर खाद्यपदार्थ विक्री, अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त दुकान उघडे ठेवणे व्यवसायिकांना चांगलेच महागात पडले आहे. लॉकडाऊन नियमांचा भंग केल्याप्रकरणी शहरात तब्बल बारा व्यावसायिकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोल्हापुरात नियमांचा भंग केल्याप्रकरणी १२ व्यवसायिकांवर गुन्हे दाखल
लॉकडाऊन काळात नियमांचा भंग केल्याप्रकरणी तसेच जागेवर खाद्यपदार्थ विक्री, अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त दुकान उघडे ठेवणे व्यवसायिकांना चांगलेच महागात पडले आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी 15 मेपर्यंत राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र कोल्हापुरातील दुकान बंद पण रस्त्यावरची गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलत केवळ सात ते अकरा या वेळेत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र या वेळेत किराणा दुकानदार, खाद्यपदार्थ स्टॉल यांनी घरपोच सेवा देण्याचा नियम देण्यात आला आहे. तसेच 7 ते 11 या व्यतिरिक्त इतर वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचा प्रकार कोल्हापूरात घडत असल्याने जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर शैलेश बलकवडे यांनी गुन्हा नोंद करण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलीस प्रशासनाने गस्तीवर असताना दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी बारा व्यावसायिकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये जाग्यावर खाद्यपदार्थ देणे, अत्यावश्यक सेवेतील दुकान नसताना दुकान उघडून ठेवणे अशा कारणाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.