महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर; तालुकास्तरावर पुन्हा कोविडसेंटर सुरू करा- सतेज पाटील - Satej Patil latest news

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर देखील उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेत प्रशासनाला सूचना केल्या.

सतेज पाटील
सतेज पाटील

By

Published : Feb 22, 2021, 5:54 PM IST

Updated : Feb 22, 2021, 7:35 PM IST

कोल्हापूर- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पुन्हा कोविडसेंटर सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. तसेच उर्वरित आरोग्य कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपर्यंत कोरोना लस घ्यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.

सतेज पाटील

कोरोना रुग्णांचा आढावा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर देखील उपस्थित होते. पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेत प्रशासनाला सूचना केल्या. तालुकास्तरावर कोविड सेंटर तयार ठेवावीत, तसेच कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन पुरवठा योग्यरीत्या सुरू आहे का? याची खात्री करावी, असे आदेश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत.

विना मास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

तसेच कोरोना रुग्णांचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने वाढवावे, त्यांच्या संपर्कात राहून कोरोना रुग्णांचा शोध घ्यावा, नागरिकांनी साधारण ताप, सर्दी आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये, तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे,असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील बाराशे गावांमध्ये प्रत्येक गावात टेस्टिंग ची संख्या वाढवावी, जेणेकरून कोरणा बाधित रुग्णांची आकडेवारी आपल्याला निश्चित करता येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील ५० टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. पण येत्या शुक्रवारपर्यंत सर्वांनी कोरोना लस घ्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले. नागरिकांनीदेखील विना मास्क फिरू नये. जर नागरिक विना मास्क फिरताना दिसले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला देण्यात आले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी करू नये, कोरोनाची वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सर्व नियम पाळावेत, तसेच मंगल कार्यालय, समारंभ हॉल या ठिकाणी करडी नजर ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

अन्यथा कर्नाटकचे प्रवासी रोखू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील प्रवाशांना बंदी घातल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील चांगलेच संतापले आहेत. कर्नाटक सरकार अडमुठी भूमिका घेत असेल, तर आम्हाला देखील कर्नाटकचे प्रवासी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल, असा इशारा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.

Last Updated : Feb 22, 2021, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details