कोल्हापूर: गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी आहे. गाढवीनच दूध हे अन्य प्राण्यांच्या दुधापेक्षा महाग आणि दुर्मिळ असल्याने यापासून सौंदर्य प्रसाधन तयार केले जातात. मात्र असे असले तरी, सध्या गाढव प्रजाती दुर्मिळ होत चालले आहे. गाढवाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यामुळे त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पंचमहाभूत लोकोत्सवात जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात आले होते. यामध्ये देशी प्रजातींच्या गाय, म्हशी, बकरी, अश्व, गाढव, कुत्रे व मांजर यांचाही समावेश करण्यात आला होता. तर हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकरी वर्गासह विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती.
गाढवांसाठी प्रदर्शन: शिवाय या प्रदर्शनात केवळ जनावरच पाहता येणार नाही तर, त्यांच्याबद्दलची माहिती आणि जनावाराची सौंदर्य स्पर्धाही पार पडली. कणेरी मठावर नेहमीच देशी जनावरांचे काळजी घेत देशी प्रजातीची वाढ कशी होईल याचा प्रयत्न सुरू असतो. मठात देशी गाईंची गोशाळा, भटक्या कुत्र्यांची शाळा देखील सुरू आहे. येथे हजारो रस्त्यावरील मोकाट कुत्रे ठेवण्यात आली आहे. शिवाय दोन वेळेचे जेवण औषधोपचार या केले जाते. मात्र आता गाई म्हशी कुत्र्यानप्रमाणे गाढवाची प्रजातीची वाढ व्हावी म्हणून विशेष स्वरूपात गाढवांसाठी प्रदर्शन भरवण्यात आले