कोल्हापूर - करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातला 2018 - 19 सालातला खजिना खुला करण्यात आला आहे. एक वर्षात देवीच्या चरणी भाविकांनी तब्बल ३ किलो ४३२ ग्रॅम सोने आणि १० किलो ११६ ग्रॅम चांदी अर्पण केलीय. मंदिरात एकूण १७ दानपेट्या आहेत त्यामधून हे दागदागिने जमा झाले आहेत.
अबब... अंबाबाई चरणी भाविकांनी केले इतके भरभरुन दान...! - Kolhapur
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने नुकतेच भाविकांकडून दान केलेल्या या दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात आले. एक वर्षात देवीच्या चरणी भाविकांनी तब्बल ३ किलो ४३२ ग्रॅम सोने आणि १० किलो ११६ ग्रॅम चांदी अर्पण केलीय. याबद्दल माहिती दिलीय देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी.

अंबाबाईचे दागिने
अंबाबाईचे दागिने
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने नुकतेच भाविकांकडून दान केलेल्या या दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात आले. विशेष म्हणजे या दागिन्यांमध्ये सोन्याचा एक किरीट आणि ११ तोळ्याचे एक बिस्कीट आकर्षण ठरले आहे. गेल्या आठवड्यात ज्यावेळी रोख रक्कम मोजण्यात आली त्यावेळीही ती एक कोटी रुपयांपेक्षा जास्त गेली होती, त्यामुळे यंदा लाखो भाविकांनी माबाबई मंदिरात भेट देऊन देवीच्या चरणी भरभरून दान अर्पण केले आहे.
Last Updated : Jun 21, 2019, 5:32 PM IST