कोल्हापूर -कोरोना विषाणूचा देशातील प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'जनता कर्फ्यू'ची हाक दिली आहे. लोकांनी घरीच थांबून या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन मोदींनी केले होते. त्याला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोल्हापुरात पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; रस्त्यांवर शुकशुकाट - कोल्हापुरात पंतप्रधानांच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद
कोल्हापूर जिल्ह्यात जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळत असून शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर
कोल्हापूरकरांनी आज चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला आहे. महावीर गार्डनमध्ये दररोज सकाळी प्रभात फेरीसाठी शेकडो लोकांची गर्दी असते, त्याठिकाणी एकही व्यक्ती फिरताना दिसत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वर्दळीचा मध्यवर्ती बसस्थानक परिसर, दाभोलकर कॉर्नर, दसरा चौक यासह प्रमुख गर्दी जमणाऱ्या ठिकाणी शुकशुकाट असल्याचे दिसत आहे.
Last Updated : Mar 22, 2020, 9:43 AM IST