कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1 हजार 26 जण घेत आहेत.
जिल्ह्यात 9 'कम्युनिटी किचन'च्या माध्यमातून 1 हजार जणांची भोजनाची सोय
जिल्ह्यामध्ये कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1 हजार 26 जण घेत आहेत.
तालुकानिहाय सुरू झालेली कम्युनिटी किचन
करवीर तालुका - सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी, हॉटेल आनंद कोझी लक्ष्मीपुरी
हातकणंगले तालुका - घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव, अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव
गगनबावडा तालुका - माधव विद्यालय आणि समाज कल्याण निवासी शाळा वसतिगृह
राधानगरी तालुका - पर्यटन निवास ग्रामपंचायत राधानगरी
कागल तालुका - श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यालय
अशा एकूण 9 ठिकाणी कम्युनिटी किचन कालपासून सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट, रात्रीचे जेवण देण्यात येत आहे. याचा लाभ 1 हजार 26 स्थलांतरित कामगारांना होत आहे.