कोल्हापूर - कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकाकडे कोरोना चाचणीचा अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले होते. शिवाय ज्यांच्याकडे अहवाल नसेल त्यांना 7 दिवस अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, 24 तासांच्या आतच हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज याबाबत माहिती दिली.
कोल्हापुरात येणाऱ्यांकडे कोरोना चाचणी अहवाल असणे बंधनकारक नाही - collector Daulat Desai Corona Report order
कोरोना प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रत्येकाकडे कोरोना चाचणीचा अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, 24 तासांच्या आतच हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज याबाबत माहिती दिली.
सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी निर्णय
काल सायंकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्ह्यात येण्यासाठी कोरोना चाचणी अहवाल असणे बंधनकारक केले होते. ज्यांच्याकडे अहवाल नाही त्यांना सात दिवस संस्थात्मक किंवा गृह अलगीकरणात राहावे लागणार, असा आदेश होता. मात्र, सर्वसामान्य नागरिकांची यामुळे गैरसोय होणार होती. शिवाय त्यांना याचा त्रास होणार याबाबत अनेक प्रतिक्रिया आल्यामुळे आज सकाळी जिल्हाधिकारी देसाई यांनी हा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वांनी शासनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले.
हेही वाचा -कोल्हापुरात पहिल्याच दिवशी मिनी लॉकडाऊनचे उल्लंघन; कोरोना नियमही पायदळी