कोल्हापूर- कोरोनानंतर राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण सापडल्यानंतर त्याची धास्ती जिल्ह्यांतील आरोग्य विभागासह कर्नाटक राज्यानेही घेतली आहे. कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी पुन्हा कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आरटीपीसीआरचा अहवाल नसेल तर अँटिजन टेस्ट बंधनकारक केली आहे. तर कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असताना केवळ ई-पास व आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र तपासले जात आहे.
कोरोनाच्या डेल्टा प्लसचा धसका कर्नाटक राज्यातील सरकारने घेतला असून कोगणोळी टोलनाक्यावर पोलिसांनी कसून तपासणी सुरू केली आहे. केवळ 48 तासातील आरटीपीसीआर चाचणीचे निगेटीव्ह अहवाल असेल तरच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. आरटीपीसीआरचा अहवाल नसेल तर अँटिजन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तशी व्यवस्था सीमेवर केली आहे. एखादा नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना कर्नाटक सरकारने दिल्या आहेत.
- कर्नाटककडून कोल्हापूर, साताऱ्याकडील बससेवा बंद
राज्यातील कोरोनाची परिस्थिती वाढत असताना कर्नाटकाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद केल्या होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारने कर्नाटकातून कोल्हापूर, साताऱ्याकडे जाणारी बससेवा सुरू केली होती. पण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने कर्नाटक सरकारने त्याची धास्ती घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्नाटक सरकारने कोल्हापूर-सातारा बस सेवा बंद केली आहे.
- महाराष्ट्र सीमेवर कागल येथे तपासणी