महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोनाचा तिसरा बळी; रात्रीपासून पुन्हा 5 रुग्णांची वाढ - कोल्हापूर कोरोना रुग्ण

जिल्ह्यात यापूर्वी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये आता आणखीन एकाची वाढ झाली असून एकूण मृतांची संख्या 3 वर पोहोचली आहे. संबंधित मृत व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात होती.

सीपीआर कोल्हापूर
सीपीआर कोल्हापूर

By

Published : May 27, 2020, 1:43 PM IST

कोल्हापूर- कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना आज जिल्ह्यात कोरोनाचा आणखीन एक बळी गेला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील चन्नेकुपी गावातील एका 55 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक केम्पी पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात यापूर्वी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये आता आणखीन एकाची वाढ झाली असून एकूण मृतांची संख्या 3 वर पोहोचली आहे. संबंधित मृत व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात होती. 17 मे रोजी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मृत्यूनंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.

दरम्यान, मंगळवार रात्री 8 पासून आज सकाळी 10 पर्यंत एकूण 585 स्वॅबचे अहवाल सीपीआर प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एकूण 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील 2, गडहिंग्लज तालुक्यातील 2 आणि इतर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यामुळे कोल्हापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 383 वर जाऊन पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक 121 रुग्ण शाहूवाडी तालुक्यातील आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी आत्तापर्यंत 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर तिघांचा मृत्यू झाला आहे. सद्या 359 जणांवर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details