कोल्हापूर- आज आणखी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातील कोरोनाचा हा 5 वा बळी ठरला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जर्दाळ गावातील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुद्धा झपाट्याने वाढत चालली आहे. कोल्हापुरात आज सकाळी 10 पासून 47, तर गेल्या 24 तासात तब्बल 71 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळते आहेत.
कोल्हापुरात कोरोनाचा पाचवा बळी; 24 तासात 71 नवे रुग्ण - कोल्हापूर कोरोना घडामोडी
कोल्हापुरातील एकूण रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोल्हापुरात सध्या समूह संसर्गाचा धोका नाही. बाहेरून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाला प्रसार रोखण्यात मोठे यश मिळाले आहे, असे म्हणावे लागेल.
एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 554 वर जाऊन पोहोचली आहे. विशेष म्हणजे आज सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात एकूण 14 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोल्हापुरात पुन्हा एकदा पुणे-मुंबईवरून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.
कोल्हापुरातील एकूण रुग्णांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास कोल्हापुरात सध्या समूह संसर्गाचा धोका नाही. बाहेरून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाला प्रसार रोखण्यात मोठे यश मिळाले, असे म्हणावे लागेल. दरम्यान, 554 रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण शाहूवाडीतील आहेत. आजपर्यंत एकूण 132 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्या जिल्ह्यात 417 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, आज दिवसभरात गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक 25 रुग्ण वाढले आहेत.