कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 398 वर आली आहे. दिवसभरात 20 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 55 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील एकूण 49 हजार 60 रुग्णांपैकी 46 हजार 983 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1679 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सक्रिय रुग्णांची संख्या 398 इतकी झाली आहे.
हेही वाचा-आनंदाची बातमी : रुग्णसंख्येत घट झाल्याने कोल्हापूरातील दोन कोविड केअर सेंटर बंद
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या आकडेवारी एक नजर
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
आजरा- 862, भुदरगड- 1227, चंदगड- 1212, गडहिंग्लज- 1463, गगनबावडा- 146, हातकणंगले- 5282, कागल- 1663, करवीर- 5624, पन्हाळा- 1856
राधानगरी- 1236, शाहूवाडी- 1350, शिरोळ- 2799, नगरपरिषद क्षेत्र- 7421, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14915
हेही वाचा-कोरोना नियम झुगारून कर्नाटकातून महाराष्ट्रात सुरू आहेत प्रवेश; कुठलीही तपासणी नाही
इतर जिल्हा व राज्यातील 2 हजार 304 असे मिळून एकूण 49 हजार 60 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर लवकरच कोरोनामुक्त होईल, असे सर्वजण आशा करत आहेत. नागरिकांनीसुद्धा कोल्हापूर कोरोनामुक्त बनविण्यासाठी आणखी काही दिवस अशाच पद्धतीने नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
1 वर्षांपेक्षा लहान - 56 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 1, 866 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 3, 442 रुग्ण
21 ते 50 वर्ष- 26, 100 रुग्ण
51 ते 70 वर्ष- 14, 049 रुग्ण
71 वर्षांपेक्षा जास्त - 3, 547 रुग्ण
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीत शिथीलता-
परराज्यातून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या प्रवाशाची कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. नुकतेच राज्य शासनाने याबाबतचा आदेश काढला असून राज्याच्या अनेक सीमांवर सध्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे. मात्र, कोल्हापूरच्या बाजूला असणार्या कर्नाटक सीमेवरती हे चित्र पाहायला मिळत नाही. शासनाच्या नवीन आदेशानुसार कोणत्याही पद्धतीची तपासणी केंद्र किंवा नाका याठिकाणी करण्यात आला नसून कर्नाटकसह गोव्यामधूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी या मार्गावरून महाराष्ट्रात येत आहेत.