महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परजिल्ह्यातून कोल्हापुरात यायचे असेल तर आता 'हे' आहेत नियम; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - kolhapur breaking news

आता कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कडक उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येकाकडे आता कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी दौलत देसाई
जिल्हाधिकारी दौलत देसाई

By

Published : Apr 6, 2021, 9:03 PM IST

Updated : Apr 6, 2021, 10:37 PM IST

कोल्हापूर - वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कडक उपाययोजना केल्या जात आहेत. कोल्हापूर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या आणि जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रत्येकाकडे आता कोरोना निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय परजिल्ह्यातून कोल्हापुरात आल्यास आणि त्याची कोरोना चाचणी केली नसल्यास त्यांना 7 दिवस संस्थात्मक किंवा गृह अलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यासाठी गावागावातील ग्रामसमित्याही कार्यान्वित करण्यात आल्या असून बाहेरून आलेल्या प्रत्येकाची यामुळे माहिती मिळणार आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

माहिती देताना जिल्हाधिकारी

काय आहेत नियम ? यावर एक नजर

  1. कोल्हापुरातून बाहेर जायचे असेल किंवा कोल्हापुरात यायचे असेल तर प्रत्येकाची कोरोना चाचणी बंधनकारक
  2. जर बाहेरच्या जिल्ह्यातून कोल्हापूरात येणार असाल आणि आपण कोरोना चाचणी तसेच लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असाल तर आपल्याला कोल्हापुरात प्रवेश मिळणार असून अलगिकरणात राहावे लागणार नाही.
  3. जिल्ह्यात प्रवेश करण्याआधी केवळ 48 तास आधीचा कोरोना चाचणी रिपोर्ट ग्राह्य धरला जाणार आहे.
  4. जर कोल्हापुरात प्रवेश करताना रिपोर्ट नसतील तर आपण ज्या ठिकाणी जाणार आहे. तेथील कोरोना चाचणी केंद्रात जाऊन आपली चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. शिवाय त्याचा अहवाल येईपर्यंत अलगिकरणात राहावे लागणार आहे.
  5. जिल्हयामध्ये सर्वत्र ग्रामसमिती, प्रभागसमिती कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. शिवाय या समितीकडून आपल्या गावात किंवा शहरात बाहेर जिल्ह्यातून कोण आहे याची प्रशासनास संपूर्ण माहिती मिळणार आहे.
  6. गावामध्ये प्रवेश देणे किंव्हा संस्थात्मक, गृहअलगीकरणात ठेवण्याचा निर्णय ग्रामसमिती आणि प्रभाग समिती घेणार आहे.
  7. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई होणार आहे.

हेही वाचा -कोल्हापुरात गेल्या 5 दिवसात 572 नवे कोरोनाग्रस्त तर 16 जणांचा मृत्यू

Last Updated : Apr 6, 2021, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details