कोल्हापूर- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर कोरोनामुक्तीची गुढी उभारली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी गुढीची विधिवत पूजाही केले. ही गुढी कोरोना मुक्तीची असल्याचे सांगत मुश्रीफ यांनी जनतेला घाबरू नका, खबरदारी आणि सावधगिरी बाळगा, असे आवाहनही केले.
ग्रामविकास मंत्र्यांनी उभारली कोरोनामुक्तीची गुढी - गुढी
आज मराठी नववर्षाची सुरुवात आजच्या दिवशी महाराष्ट्रात सर्वजण गुढी उभी करुन गुढी पाडवा साजरा करतात. सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटामुळे सर्वजण कोरोनामुक्तीची प्रार्थना करत आहेत. त्याचप्रमाणे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कागल येथील घरासमोर कोरोनामुक्तीची गुढी उभारली.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, आपल्या गुढीपाडव्याच्या सणावर कोरोनाची दाट छाया आहे, याची हुरहूरही माझ्या मनात आहे. खर तर आपण कुणीच कल्पना केली नव्हती, असे महाभयानक संकट साऱ्या जगाच्या दारी येऊन उभे ठाकले आहे. म्हणून आज कोरोना मुक्तीची गुढी उभारण्याची वेळ आली असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले.
हेही वाचा -कोल्हापुरातील 194 जण 'निगेटिव्ह'...14 दिवसांचा कालावधी पूर्ण
Last Updated : Mar 25, 2020, 12:14 PM IST