कोल्हापूर - कसबा बावडा येथील कोरोनाबाधित वृद्ध महिलेच्या संपर्कात एकूण 24 जण आल्याचे समोर आले होते. त्यापैकी 15 जण त्या महिलेचे नातेवाईक आहेत. त्या वृद्धेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांचीसुद्धा तत्काळ तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये तिच्या घरातील 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनासह कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बावड्यातील 'त्या' कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेच्या कुटुंबातील 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह
कसबा बावडा येथील कोरोनाबाधित वृद्ध महिलेच्या संपर्कात एकूण 24 जण आल्याचे समोर आले होते. वृद्धेला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच तिच्या कुटुंबियांचीसुद्धा तत्काळ तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये तिच्या घरातील 5 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
तपासणी केलेल्या नातेवाईकांमध्ये वृद्धेचा पती, मुलगा, सून, नातू आणि नात यांचा समावेश आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत 41 जणांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यातील सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मात्र, त्या वृद्ध महिलेच्या संपर्कात आलेल्या एकूण 15 जणांना क्वारेन्टाईन ठेवण्यात आले आहे.
शहरातील भक्तीपूजा नगरमधील कोरोनाचा जो पहिला रुग्ण होता त्याचे उपचाराचे 14 दिवस पूर्ण झाले आहेत. त्याचेही स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आज सायंकाळी त्याचा अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे.