कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतच चालली आहे. आज कोरोनाच्या आजपर्यंतच्या एकूण रुग्णसंख्येने 1 लाखांचा आकडा पार केला आहे. दिवसभरात 57 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 497 नवे रुग्ण आढळले आहेत तर 1704 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 13 हजार 257वर पोहोचली आहे.
कोल्हापुरातील एकूण रुग्णसंख्या लाखांच्या पार
जिल्ह्यात आजपर्यंतची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 695वर पोहोचली आहे. त्यातील 83 हजार 990 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारीला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 257वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 3 हजार 448 झाली आहे.
हेही वाचा - केंद्रीय मंत्र्यांचे टूलकिटवरील ट्विट मॅनीप्युलेटिव्ह मीडिया' म्हणून टॅग करावे- काँग्रेसची ट्विटरकडे मागणी
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
जिल्ह्यात आजपर्यंतची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 695वर पोहोचली आहे. त्यातील 83 हजार 990 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारीला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 13 हजार 257वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 3 हजार 448 झाली आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 162 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 3581 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 7433 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 56596 रुग्ण
51 ते 70 वर्ष -26123 रुग्ण
71 वर्षांवरील - 6800 रुग्ण
तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 41
2) भुदरगड - 74
3) चंदगड - 38
4) गडहिंग्लज - 82
5) गगनबावडा - 9
6) हातकणंगले - 175
7) कागल - 45
8) करवीर - 198
9) पन्हाळा - 60
10) राधानगरी - 21
11) शाहूवाडी - 30
12) शिरोळ - 118
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 146
14) कोल्हापूर महानगरपालिका - 379
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 81