कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 600 वर येऊन पोहोचली आहे. दररोज रुग्ण आढळण्याचे प्रमाणही रुग्ण बरे होण्याच्या तुलनेत कमी झाले आहे. कोल्हापूरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.
कोल्हापूर: कोरोना बाधितांचे झाले कमी प्रमाण; बाधितांची एकूण संख्या ६०० - Kolhapur corona death rate
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण असेच कमी होत राहिले तर लवकरच कोल्हापूर कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कोल्हापूरात 605 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्रमाण असेच कमी होत राहिले तर लवकरच कोल्हापूर कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कोल्हापूरात 605 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यात दिवसभरात 11 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या आकडेवारी एक नजर
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
- आजरा- 852
- भुदरगड- 1215
- चंदगड- 1203
- गडहिंग्लज- 1454
- गगनबावडा- 144
- हातकणंगले- 5268
- कागल- 1659
- करवीर- 5594
- पन्हाळा- 1846
- राधानगरी- 1226
- शाहूवाडी- 1339
- शिरोळ- 2781
- नगरपरिषद क्षेत्र- 7387
- कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14792
- इतर जिल्हा व राज्यातील 2, 269 असे मिळून एकूण 48 हजार 729 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 48 हजार 729 पॉझीटिव्ह रुग्णांपैकी 46 हजार 455 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 1,667 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत सक्रिया रुग्णांची संख्या 605 इतकी आहे.
वयोगटानुसार एकूण रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
- 1 वर्षांपेक्षा लहान - 56 रुग्ण
- 1 ते 10 वर्ष - 1864 रुग्ण
- 11 ते 20 वर्ष - 3426 रुग्ण
- 21 ते 50 वर्ष - 25916 रुग्ण
- 51 ते 70 वर्ष - 13941 रुग्ण
- 71 वर्षांपेक्षा जास्त - 3526 रुग्ण