कोल्हापूर - आज आणखी 52 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सकाळपासून 2 रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यापासून मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत आहेत. आजपर्यंत एकूण 689 रुग्णांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 528 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी नक्कीच ही दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. आता मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.
कोल्हापूरसाठी मोठा दिलासा; आणखी 52 रुग्णांनी केली कोरोनावर मात - कोरोनामुक्त कोल्हापूर कोरोना रुग्ण
आजपर्यंत एकूण 689 रुग्णांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 528 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी नक्कीच ही दिलासादायक बाब आहे.
कोल्हापूर कोरोना
आजअखेर तालुका, नगरपालिका आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
- आजरा- 74
भुदरगड- 68
चंदगड- 74
गडहिंग्लज- 78
गगनबावडा- 6
हातकणंगले- 7
कागल- 56
करवीर- 14
पन्हाळा- 25
राधानगरी- 63
शाहूवाडी- 174
शिरोळ- 7
नगरपरिषद क्षेत्र- 11
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-24
असे एकूण 681 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2, आंध्रप्रदेश-1 आणि मुंबई-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 689 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण 689 रुग्णांपैकी 528 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यात अद्याप 153 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.