कोल्हापूर -आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस व विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने पालकमंत्री सतेज पाटील (Guardian Minister satej patil house ) यांच्या कसबा बावड्यातील घरासमोर खर्डा भाकरी आंदोलन (Construction labourer agitation) करण्यात आले. आता आम्ही खर्डा भाकरी आंदोलन करतोय शासनाने जर मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी कामगारांच्या वतीने देण्यात आला.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आश्वासन अद्याप स्वप्नच -
कामगारांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ (Labor Minister Hassan Mushrif) त्यांच्याकडे यापूर्वीसुद्धा अनेक मागण्यांबाबत साकडे घालण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी कामगारांना दिलासा देण्याबाबतचे आश्वासन दिलं होतं. त्याचबरोबर कामगारांचे विविध प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडू असंही म्हटलं होते. शिवाय कामगारांना दिवाळी बोनस पाच हजार रुपये देऊ, असे आश्वासनही मंत्री मुश्रीफ (Labor Minister Hassan Mushrif) यांनी दिले होते. मात्र आज अखेर मुश्रीफ यांची ही केवळ घोषणा होती, प्रत्यक्षात कामगारांच्या खात्यावर १ रुपया देखील जमा झाला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. आज पालकमंत्र्यांच्या दारात आमचे गाऱ्हाणे मांडत असून त्यांनी तरी किमान आमच्याकडे लक्ष द्यावे आणि कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी यावेळी केले आहे. येत्या काळात आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे आणि यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, असा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय गुदगे यांनी दिला आहे.