महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला निकालातून उत्तर दिले' - बाजीराव खाडे पश्चिम बंगाल निवडणूक न्यूज

पश्चिम बंगालच्या निकालावरून काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच प्रियांका गांधी यांच्या कोअर टीमचे सदस्य बाजीराव खाडे यांनी भाजपवर निशाणा साधला. 'पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला निकालातून उत्तरे दिले', असे बाजीराव यांनी म्हटले आहे.

kolhapur
कोल्हापूर

By

Published : May 2, 2021, 7:59 PM IST

कोल्हापूर - 'पश्चिम बंगालमधून आम्हाला ज्या अपेक्षा होत्या, तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. मात्र, निश्चितपणे त्या ठिकाणी भाजपने जोरदारपणे प्रचार केला होता. शिवाय देशात कोरोनाची स्थिती बिकट असताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभा घेतल्या होत्या. रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळत नाहीत. असे असताना भाजप मात्र निवडणुकीतच व्यस्त होते. त्यांना तिथल्याच जनतेने निवडणुकीच्या निकालातून उत्तर दिले आहे', असे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तसेच प्रियांका गांधी यांच्या कोअर टीमचे सदस्य बाजीराव खाडे यांनी म्हटले आहे. शिवाय केरळमध्येही काँग्रेसला अपेक्षित यश मिळताना पाहायला मिळत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला निकालातून उत्तरे दिले -बाजीराव खाडे

'कोरोना काळात भाजप सरकार अपयशी'

'कोरोनाच्या या काळात भाजपकडून मानवतावादी जबाबदारीचे पालन करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे कुठेही होताना पाहायला मिळत नाही. देशात सद्या कोरोना लसीचा तुटवडा भासू लागला आहे. लसीकरण बंद पडले आहे. अशा परिस्थितीत देशाची गरज भागवायची असताना त्यांनी बेजबाबदारपणे परदेशात लसी पाठवल्या. रेमडेसिवीर पुरवठासुद्धा व्यवस्थित नाही. लोकांना बेड, ऑक्सिजनसुद्धा मिळत नाही. त्यामुळे इतकी मोठी गंभीर परिस्थिती हाताळायचे सोडून मोठ-मोठ्या प्रचार सभा घेतल्या. त्यांच्या या बेजबाबदारपणाला पश्चिम बंगाल मधील जनतेनेच निकालातून उत्तर दिले आहे', असे बाजीराव खाडे म्हणाले.

हेही वाचा -अदर पूनावाला यांना धमकी कोणी दिली; जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

हेही वाचा -खोपोलीतील माजी नगराध्यक्ष, नगरसेवक पती - पत्नीचे एकाच दिवशी निधन

ABOUT THE AUTHOR

...view details