कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना जवळपास १ लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, आता शेट्टींनी निवडणूक आयोगाकडे मतमोजणीत फेरफार झाल्याची तक्रार केली आहे. मतमोजणीनंतर ४५९ मते ईव्हीएममधून जादा निघाली असल्याचे सांगत त्यांनी ही तक्रार केली आहे.
ईव्हीएममधून जादा मते निघालीच कशी? शेट्टींची निवडणूक आयोगाकडे तक्रार - ईव्हीएम मशीन
हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर ईव्हीएम मधून ४५९ मते जादा निघाली त्यामुळे राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे याबाबतची तक्रार केली आहे.
राजू शेट्टी
हातकणंगलेत ईव्हीएमद्वारे १२ लाख ४५ हजार ७९७ एवढे मतदान झाले. तर ईव्हीएम मधून मोजलेली मते ही १२ लाख ४६ हजार २५६ इतकी आहेत. या फरकाचे कारण काय? यासंदर्भात शेट्टींनी निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. या सर्वांचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी आयोगाकडे केली आहे.
हातकणंगले मतदारसंघात शेट्टी यांना जवळपास १ लाख मतांनी शिवसेनेच्या नवख्या धैर्यशील माने यांनी पराभूत केले होते. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.