महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा प्रभाव : महाविद्यालये सुरू करण्याचा तूर्तास विचार नाही - उदय सामंत - उदय सामंत महाविद्यालये अद्याप बंदच

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही विचार करण्यात आलेला नाही. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर याबाबत विचार होणार आहे. मात्र राज्यभरातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत तत्त्वतः निर्णय घेतला आहे.

उदय सामंत
उदय सामंत

By

Published : Oct 9, 2020, 3:10 PM IST

Updated : Oct 9, 2020, 3:39 PM IST

कोल्हापूर - राज्यात कोरोनाचा अजूनही प्रभाव आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती महाविद्यालय सुरू करण्याची नाही. राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी, संपूर्ण परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याबाबत विचार करण्यात येणार नसल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठामध्ये येऊन सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा प्रशासनाकडून आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले, राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही विचार करण्यात आलेला नाही. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर याबाबत विचार होणार आहे. मात्र राज्यभरातील ग्रंथालये सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून त्याबाबत तत्त्वतः निर्णय घेतला आहे. याचा कशा पद्धतीने नियम असावा, याबाबत येत्या 8 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ग्रंथालये सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे म्हटले असून लवकरच ग्रंथालये सुरू होणार असल्याचे सामंत म्हणाले.

सीमा भागातील शैक्षणिक संकुलाबाबत बोलताना मंत्री सामंत म्हणाले, सीमा भागातील शिनोळी या गावात दहा एकर जागा आहे. त्या ठिकाणी लवकरच शैक्षणिक संकुल उभे करण्यात येणार असून जानेवारी महिन्यापासून याठिकाणी विविध अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे. ते म्हणाले, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शाळा महाविद्यालये बंद असताना संस्थाचालक विद्यार्थ्यांच्याकडून सक्तीने फी घेत असतील तर, अशा संस्थाचालकांच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रार दाखल करावी. अशा संस्थांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही सुद्धा मंत्री उदय सामंत यांनी दिली.

माहिती देताना मंत्री उदय सामंत
Last Updated : Oct 9, 2020, 3:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details