कोल्हापूर CM Eknath Shinde in Kolhapur : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात दाखल झाले होते. कणेरी मठ येथील गो शाळेच्या आयव्हीएफ केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. मात्र, या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यभर तापला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रोखण्याचा प्रयत्न झाल्यानं मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गुप्तता ठेवली होती. कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचा हा खासगी दौरा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, कणेरी मठावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नेत्यांना गावबंदी : मराठा आरक्षण आंदोलनामुळं नेत्यांना गावात बंदी घालण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री अचानक कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, मीडियालाही यावेळी पोलिसांनी बंदी घातली होती. एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मात्र, माध्यमांना याची माहिती मिळताच पोलिसांनी चित्रीकरण थांबवलं होतं.