कोल्हापूर - येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात (आयजीएम) कोविड रुग्णांवर उपचार देण्यास होत असलेली टाळाटाळा, कोविड रुग्णांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण यासह विविध अडचणी संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या तक्रारीची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय इंदिरा गांधी सामान्य रूग्णालय येथे स्थलांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले आहेत.
आमदार आवाडेंच्या पाठपुराव्याला यश; शल्यचिकित्सकांचे मुख्यालय आता आयजीएममध्ये - kolhapur corona update news
हे रुग्णालय जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशीही मागणी आवाडे यांनी रविवारी कराड येथे खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली होती.
![आमदार आवाडेंच्या पाठपुराव्याला यश; शल्यचिकित्सकांचे मुख्यालय आता आयजीएममध्ये civil serjan office shifted in igm hospital in demand of mlaprakash aavade at kolhapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-01:04:07:1597131247-mh-kop-01-igm-hospital-story-2020-7204450-11082020112009-1108f-1597125009-265.jpg)
त्यामुळे हे रुग्णालय अत्यंत चांगल्या पध्दतीने चालविण्यासह कोविड मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांच्यावर आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे पूर्णवेळ ‘कोविड 19 विलगीकरण रुग्णालय’ करण्यात आले आहे. परंतु याठिकाणी सुविधा आणि बेडची उपलब्धता असतानाही रुग्णांना दाखल करुन घेण्याऐवजी विविध कारणे सांगून परत पाठविले जाते आहे. रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. आर. आर. शेट्ये यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे उपचार मिळत नसल्याने कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत चालल्याने सरकारने या संदर्भात गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे आमदार आवाडे यांनी म्हटले होते. गेल्या 8 दिवसांपूर्वी आवाडे यांनी रुग्णालयाकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे उपोषणाचा इशारा सुद्धा दिला होता. शिवाय हे रुग्णालय जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशीही मागणी आवाडे यांनी रविवारी कराड येथे खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केली होती.
सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पीपाटील यांना आदेश जारी केला असून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत त्यांचे मुख्यालय हे इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात स्थलांतर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता रूग्णालयात दाखल रूग्णांच्या उपचारावर नियंत्रण ठेवण्यासह कोविड रूग्णांचे मृत्युचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याची चर्चा परिसरात आहे.