कोल्हापूर -शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला पोलंडवासीयांनी हजेरी लावली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या खास आमंत्रणावरून ते कोल्हापुरात आले आहेत. या विदेशी पाहुण्यांनी खासदार संभाजीराजे यांच्या सोबत मिरवणुकीत लेझीमच्या ठेक्यावर ताल धरला. यात सहभागी विदेशी महिलांनी मंडळांच्या महिला कार्यकर्त्यांसोबत फुगडीचा फेरही धरला.
कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलंडवासीयांनी लेझीमवर धरला ठेका - पोलंड कोल्हापूर संबंध
कोल्हापुरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला पोलंडवासीयांनी हजेरी लावली. या विदेशी पाहुण्यांनी खासदार संभाजीराजे यांच्या सोबत मिरवणुकीत लेझीमच्या ठेक्यावर ताल धरला. पोलंडवासीयांनी कोल्हापूरकरांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहेत.
पोलांड वासीयांचे कोल्हापूरकरांचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून संबंध आहेत. दुसऱ्या महायुद्धावेळी पोलंडच्या निर्वासितांना कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी आश्रय दिला होता. जगातील अनेक देशांनी निर्वासित पोलंडवासीयांसाठी आश्रयाचे दरवाजे बंद केले असताना भारतातील दोन संस्थानांनी मात्र पोलंडवासीयांना आपल्या पदरात घेतले होते. ही संस्थाने होती कोल्हापूर आणि जामनगर. या घटनेला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. पोलंड आणि कोल्हापूरकरांचे असलेले दृढ संबंध या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.