महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जेव्हा स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कॅमेरा हातात घेतात... - खासदार छत्रपती संभाजीराजे

न्यु पॅलेस मधील गणेश आगमनाच्या कव्हरेजसाठी आलेल्या पत्रकार, छायाचित्रकारांचे स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी छायाचित्र काढून त्यांना सुखद धक्का दिला.

जेव्हा स्वतः श्रीमंत्र छत्रपती शाहू महाराज कॅमेरा हातात घेतात...

By

Published : Sep 2, 2019, 9:51 PM IST

Updated : Sep 2, 2019, 11:39 PM IST

कोल्हापूर - न्यु पॅलेस मधील गणेश आगमनाच्या कव्हरेजसाठी आलेल्या पत्रकार, छायाचित्रकारांचे स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी छायाचित्र काढून त्यांना सुखद धक्का दिला.

जेव्हा स्वतः श्रीमंत्र छत्रपती शाहू महाराज कॅमेरा हातात घेतात...

गेल्या अनेक वर्षांपासून पारंपारिक आणि शाही लवाजम्यासह न्यु पलेसमध्ये गणरायाचे आगमन होते. दरवर्षी अनेक पत्रकार आणि छायाचित्रकार याच्या कव्हरेजसाठी येत असतात. गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर आरती संपन्न झाली. त्यानंतर श्रीमंत शाहू महाराजांनी स्वतः एका छायाचित्रकाराचा कॅमेरा मागितला आणि आमच्या बाप्पासोबत फोटो काढा असे म्हटले. हे ऐकताच अनेकांनी धक्का बसला. सकाळपासून छायाचित्रकारांची चाललेली धडपड पाहून राजेंनी मनाचा मोठेपणा दाखवत छायाचित्रकारांचे छायाचित्र काढले. शेजारी असलेल्या खासदार छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती यशराजे यांनी सुद्धा आपल्या मोबाईलमधील कॅमेरामध्ये हा क्षण कैद केला.

Last Updated : Sep 2, 2019, 11:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details