महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्रीय मंत्री रवीशंकर यांनी माफी मागावी...'त्या' वक्तव्यावरुन संभाजीराजे छत्रपती कडाडले - रवी शंकर प्रसाद

काही दिवसांपूर्वीच सोनी या हिंदी वाहिनीच्या 'कोन बनेगा करोडपती' कार्यक्रमातील प्रश्नमंजुषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे मोठे वादंग उठले होते. त्यानंतर सोनी या वाहिनीने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली होती. त्यानंतर केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी असे वक्तव्य केल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

छत्रपती संभाजीराजे

By

Published : Nov 23, 2019, 8:50 PM IST

कोल्हापूर -छत्रपती शिवाजी महाराजांचा 'शिवाजी' एकेरी उल्लेख केल्याबद्दल केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तत्काळ बिनशर्त माफी मागावी, असे पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रवी शंकर यांना पाठवले आहे. शनिवारी भाजपने स्थापन केलेल्या सत्ताबदलावर आणि मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे अभिनंदन करण्यासाठी रवी शंकर यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा उल्लेख केला होता.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी रवी शंकर यांना पत्र पाठवले

हेही वाचा - संघाने स्वयंसेवकांना 'हे'च नैतिकतेचे धडे दिले का? - संजय राऊत

काही दिवसांपूर्वीच सोनी या हिंदी वाहिनीच्या 'कोन बनेगा करोडपती' कार्यक्रमातील प्रश्नमंजुषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे मोठे वादंग उठले होते. त्यानंतर सोनी या वाहिनीने महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली होती. त्यानंतर केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी असे वक्तव्य केल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पत्रात काय म्हटले?

आज महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी पद्धतीने केला आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करायचा अधिकार या देशात कुणालाच नाही. आजकालच्या आचार आणि विचार शून्य राजकारण्यांनी महाराजांचं नाव राजकारणात वापरू नये, अशीही सर्व शिवभक्तांची भावना आहे. त्यामुळे केंद्रीय विधी व न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी तत्काळ अन बिनशर्त माफी मागावी.

हेही वाचा - मी अजित पवारांसोबतच... राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार अनिल पाटलांचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details