ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोल्हापूर अन् साताऱ्याची गादी एकच, फालतूगिरी केल्यास ठोकून काढू' - संभाजी छत्रपती बातमी

कोल्हापूर व साताऱ्याची गादी एकच असून दोन्ही छत्रपती एकच आहेत. त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका. फालतुगिरी केल्यास ठोकून काढू, असा सज्जड इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला.

संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे छत्रपती
author img

By

Published : Sep 26, 2020, 7:57 PM IST

Updated : Sep 26, 2020, 8:03 PM IST

कोल्हापूर/नाशिक- इकडची काडी, तिकडची चाडी करू नका. कोल्हापूर व साताऱ्याची गादी एकच असून दोन्ही छत्रपती एकच आहेत. त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करू नका. फालतुगिरी केल्यास ठोकून काढू, असा सज्जड इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी दिला. ते नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते.

बोलताना खासदार संभाजी छत्रपती

खासदार संभाजीराजे म्हणाले, मराठा आरक्षण लढ्यासंदर्भात समन्वयक समिती जे काही ठरवेल, ते आपण सर्वजण मिळून करूया. तज्ज्ञ वकिलांची बैठक घेऊन मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. पण, आधी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवूया. मराठा समाजासाठी एकत्र येऊया, असे आवाहन संभाजी छत्रपती यांनी केले.

कोल्हापुरातही मराठा आरक्षण लढ्यात दोन गट पडले आहेत. एकीकडे गोलमेज परिषद झाली; मात्र, दुसरा गट या गोलमेज परिषदेला उपस्थित राहिला नाही. हे चालणार नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ही अंतिम लढाई आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने लढा देऊ, असे संभाजीराजे म्हणाले.

हेही वाचा -करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी आजचा दिवस आहे विशेष, कारण...

Last Updated : Sep 26, 2020, 8:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details