कोल्हापूर -महाविकास आघाडीने घाई गडबडीत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. त्यामध्ये अनेक त्रूटी असून ही कर्जमाफी फसवी असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या विरोधात कोल्हापूरमध्ये भाजपच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
भाजपने काढलेल्या मोर्चात महाविकास आघाडी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असल्याबाबतचे फलक घेऊन भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरून हा मोर्चा निघाला. कर्जमाफीतील अटी दूर करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.