कोल्हापूरMaratha Reservation : मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांनी एकदाही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली नाही. त्यांना चर्चा करायला जमत नसेल तर मंत्री पाटील यांनी उपसमिती अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. तर वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणारे मंत्री गिरीश महाजन कोण? (Minister Girish Mahajan) तसेच मराठा नेत्यांना चर्चेसाठी पाठवून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे का? असा सवाल कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं उपस्थित करण्यात आला आहे. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर जिल्ह्यातील खासदार आमदार मंत्र्यांना सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे.
गिरीश महाजन कोण? : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरात मशाल पेटवून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे. आज साखळी उपोषणाचा दुसरा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाची आज बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकदाही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली नाही. मंत्री पाटील यांना चर्चा करायला जमत नसेल तर त्यांनी उपसमिती अध्यक्ष पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली.