कोल्हापूर - 'कंगना रणौत ज्या पद्धतीने व्यक्त होत आहे, त्याच्याशी सहमत नाही. शिवाय कालच विधेयकाला विरोध करणाऱ्यांबद्दल कंगनाने जी भाषा वापरली त्याचे सुद्धा आम्ही समर्थन करत नाही,' असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. कंगणाच्या अशा पद्धतीने लोकांच्या भावना दुखावणाऱ्या आणि विचार न करता केलेल्या कोणत्याही ट्विटशी आम्ही सहमत नाही. शिवाय कंगनाशी माझा व्यक्तिगत संवाद नाही. मात्र, व्यक्त होताना त्यांनी शब्द जपून वापरावेत, असा सल्ला सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
चंद्रकांत पाटलांनी कंगना रणौतला दिला 'हा' सल्ला...
मुंबईसंदर्भात ट्विट केल्यानंतर कंगनाला सुरक्षा देणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारवर टीका व्हायला लागली. कंगना 'भाजपा'चीच भाषा बोलत असल्याचे आरोप देखील झाले. मात्र, कंगनाने काल अध्यादेशावर केलेल्या ट्विटवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाराजी दर्शवली आहे. सोबतच तिला काही सल्ले देखील दिले आहेत.
चंद्रकांत पाटील
Last Updated : Sep 21, 2020, 4:11 PM IST