कोल्हापूर - काही लोकं स्वतःच्या सोयीनुसार हिंदुत्वाची व्याख्या करतात. परंतु, हे दुर्दैवी आहे. माती माता आणि मातृभूमीसाठी सदैव तत्पर असणारा प्रत्येक जण हिंदू असल्याचे खा. डॉ अमोल कोल्हे म्हणाले आहेत. तसेच, जातीपातीच्या राजकारणाने लक्ष वळवून महागाई आणि बेरोजगारी वरून लक्ष हटवण्याचे काम केले जात आहे अस म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, सुनील देवधर यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शरद पवारांसारख्या व्यक्तीवर बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण आहे, अशा शब्दांत देवधर यांचा कोल्हे यांनी समाचार घेतला आहे.
आम्हाला हिंदुत्व शिकवू नये - धर्माच विष नेमक कोण कालवत आहे. कोणाला पोखरत आहे अशी विचारणा करत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणी हिंदुत्व शिकवायला आले तर त्यांना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असे सांगा असे कोल्हे म्हणाले आहेत. काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारा साठी ते आज कोल्हापुरात आले होते त्यावेळी ते बोलत होते.
कोल्हापूरसाठी त्यांनी काय केले? - चंद्रकांत पाटील भविष्य सांगत वारी करणारे ज्योतिष - कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या काँग्रेसचे उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी कोल्हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवाजी पेठ येथे झालेल्या सभेत त्यांनी भाजपवर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. मतदारांना ईडी'ची धमकी देणारे चंद्रकांत पाटील हे गेल्या वेळेस पालकमंत्री असताना आणि दोन नंबरचे मंत्री असताना देखील कोल्हापूरसाठी त्यांनी काय केले? असा सवाल त्यांनी विचारला आहे. राजश्री शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचे काम सुरू असताना त्यांनी एक चुटकी दमडीसुद्धा दिली नाही. तर, मत मागायला कसे येतात असही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.